top of page

…त्याला प्रेम ऐसे नाव होते

Updated: Apr 13, 2021



काळजाचा पायथ्याशी वसलेले एक गाव होते

हृदयाच्या अंतरात कोरलेले एक नाव होते


निरागस मनाच्या कोपऱ्यात भावनांचा कल्लोळ होता

शब्दात सांगणे शक्य नव्हते हाच मोठा घोळ होता


शब्दांतही न सांगता तिला सर्व काही कळले होते

आमच्या मनातील सप्तरंग आता कुठे जुळले होते


रक्ताच्या नात्यापेक्षा भावनेचे नाते घट्ट बनले होते

तिचाच सुखात मन माझे रमले होते


दिवसा तिच्या आठवणीत मन माझे झुलत होते

रात्री तिच्या स्वप्नांत मन माझे फुलत होते


त्या हृदयस्पर्शी भावनेचे प्रेम ऐसे नाव होते


***


का जाणे मज भेटीसाठी येणे ती आता टाळत आहे

का जाणे मज सहवासातून दूर ती आता पळत आहे


तिचाच आठवणीत मी आता झुरत आहे

मला कळलेच नाही, कोणीतरी दुसरा तिच्या मनात मुरत आहे


आयुष्यातील रंग उधळुनी ती निघुन गेली आहे

कोणा दुसऱ्यासाठी ती मजला सोडून गेली आहे


रक्ताच्या नात्यांनाही मी आता मुकलो आहे

आता समजले आयुष्यात मी किती चुकलो आहे


मनपटलाच्या खेळामध्ये मी असा हरलो आहे

एकांततेच्या सागरात मी आता बुडतो आहे.


ह्या जीवघेण्या वेदनेचे प्रेम ऐसे नाव आहे


-सिद्धांत आवले


Thank you Siddhant for being my guest and sharing your work with us. Lots of love. :)

Hi reader, if you enjoy my blog posts, you must subscribe to my blog as a lot of interesting stuff is coming up. Let me know what you think of this piece. Like/comment if you were excited to read this poem/song. Okay bye. See you next Sunday. And, happy reading.

bottom of page